भोंगे वाद : इरफान शेख यांची मनसेला सोडचिठ्ठी; म्हणाले, 'कोणाकडे भावना व्यक्त करू'

मनसे राज्य सचिवांनी अध्यक्षांकडे सोपवला राजीनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि  इरफान शेख
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इरफान शेख sakal

डोंबिवली: गुढीपाडवा मेळाव्यानंतर ठाणे येथील उत्तर सभेत देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा मशिदींवरील भोंगे संदर्भात विधान केले आहे. 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदींवर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज यांनी दिला आहे. राज यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील काही मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत. कल्याण येथील मुस्लिम समाजात देखील राज यांच्या भूमिकेविषयी नाराजी असून मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी गुरुवारी पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र केला आहे. आपला पदाचा आणि पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. अत्यंत भावनिक होत शेख यांनी हा राजीनामा दिला असून आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजाच्या विरोधात पक्षाध्यक्ष द्वेषात्मक भूमिका घेत असतील तर समाजासाठी पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी शेख यांनी व्यक्त केली.

गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावरील जाहीर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटले पाहिजेत अशी भूमिका घेतली होती. ठाणे येथील सभेतही राज यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत आता 3 मे पर्यंतचा कालावधी सरकारला दिला आहे. राज यांच्या भूमिकेमुळे मुस्लिम समाजात नाराजीचे वातावरण आहे. यातूनच कल्याण येथील मनसेचे महाराष्ट्र राज्य सचिव शेख यांनी अध्यक्ष राज यांच्याकडे गुरुवारी पक्षातील पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा सोपविला आहे. शेख यांनी म्हटले आहे की, पक्ष स्थापनेपासून मी राज यांच्यासोबत कार्य करीत आहे. पक्षाच्या अनेक आंदोलनात सहभागी होत केसेस अंगावर घेतल्या आहेत. 2008 साली मराठी पाट्यांविषयी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक करीत संपूर्ण अंग निळे होईपर्यंत मारहाण केली होती. त्यावेळी राज यांनी या जखमा विसरु नको, बाकी मी बघतो असे सांगितले होते. हे दिवस बघायला मिळाले आहेत.

एका बाजूने समाजात कुचंबणा आणि दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने कोणाकडे आपल्या भावना सांगाव्या ? खूप जड अंतकरणाने मी राजीनामा सोपविला आहे. माझे कुटूंब आणि समाज यापुढे मी हतबल आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी मला आपल्या सोबत काम करण्याची प्रेरणा दिली तेच आज तुमची साथ सोडण्याची सूचना करत आहे. 16 वर्षात आजच आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्या सोबत असतांना तुम्ही आम्हाला का नाही या गोष्टी बोललात आम्ही याचा सोक्षमोक्ष आपल्या समोर केला असता परंतू ते झाले नाही. ब्लू प्रिंट, विकासाच्या भव्य दिव्य कल्पना एक दिवशी अचानक मशिदींवरील भोंगे आणि मदरस्यावर येऊन थांबतात तेव्हा मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जाते असेही ते म्हणतात.

मदरसांमध्ये काही चुकीचे घडत असेल तर माझ्यासोबत चला मी दाखवतो मदरसे..मात्र बदनामी का? मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं.त्यांना मस्जिदच्या भोंग्या पासून त्रास होतो,मदरस्यानां बदमान करायचं काम त्यांचं आहे.अश्या शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज का पडली? असे प्रश्न देखील शेख यांनी राज यांना विचारले आहेत.

निवडणूकीत फटका बसेल

कल्याण शहरात मुस्लिम बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणात असून निवडणूकांमध्ये येथील मुस्लिम बांधवांनी मनसेचे राजू पाटील यांच्या बाजूने उभे रहात त्यांना पाठिंबा दर्शविला होता. 2009 साली विधानसभा निवडणूकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर उभे होते. त्यांना या मुस्लिम मतदारांनी मतदान केले होते. बैल बाजार, पत्रीपूल, दूध नाका, गोविंदवाडी बायपास अशा परिसरात मुस्लिम बहुल वस्ती आहे. मुस्लिम समाज तसेच मराठी समाजात इरफान यांचे एक वेगळेच स्थान असून त्यांना मानणारा वर्ग आहे. मात्र आता मनसे पक्षानेच अशी भूमिका घेतल्याने मुस्लिम बांधव मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून याविषयी विचारणा करीत असून त्यांच्यात नाराजी आहे. अखेर समाजासोबत जाण्याचे ठरवित शेख यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सोपविला आहे.

यावर आता कार्य निर्णय होतो हे पहावे लागेल.कल्याण शहरात मुस्लिम बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणात असून निवडणूकांमध्ये येथील मुस्लिम बांधवांनी मनसेचे राजू पाटील यांच्या बाजूने उभे रहात त्यांना पाठिंबा दर्शविला होता. 2009 साली विधानसभा निवडणूकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर उभे होते. त्यांना या मुस्लिम मतदारांनी मतदान केले होते. बैल बाजार, पत्रीपूल, दूध नाका, गोविंदवाडी बायपास अशा परिसरात मुस्लिम बहुल वस्ती आहे. मुस्लिम समाज तसेच मराठी समाजात इरफान यांचे एक वेगळेच स्थान असून त्यांना मानणारा वर्ग आहे. मात्र आता मनसे पक्षानेच अशी भूमिका घेतल्याने मुस्लिम बांधव मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून याविषयी विचारणा करीत असून त्यांच्यात नाराजी आहे. अखेर समाजासोबत जाण्याचे ठरवित शेख यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सोपविला आहे. यावर आता कार्य निर्णय होतो हे पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com