आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, बलात्काराचा गुन्हा दाखल

माझ्यासह माझ्या १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी, महिलेचा आरोप
आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, बलात्काराचा गुन्हा दाखल
Summary

माझ्यासह माझ्या १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी, महिलेचा आरोप

ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी मार्च २०२१ मध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केल्याप्रकरणी शुक्रवारी (१५) रात्री सीबीडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्र अधिनियम ३० आणि कलम ४१७ व ५०६ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात याआधीच मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माझ्यासह माझ्या १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी गणेश नाईक यांनी दिल्याची लेखी तक्रार काही दिवसांपूर्वीच संबंधित महिलेने नेरूळ पोलिस ठाण्यात केली होती. आमदारांच्या कार्यकर्त्यांपासून आमच्या जीवाला धोका असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर नेरूळ पोलिसांनी संबंधित महिलेने केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने अदखलपात्र गुन्हा दाखल करून तिला २४ तास संरक्षण दिले आहे. याप्रकरणी राज्याच्या महिला आयोगाकडेही संबंधित महिलेने तक्रार नोंदवली होती. त्यानंतर महिला आयोगाकडूनही नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याबाबतचे पत्र देण्यात आले होते.

आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, बलात्काराचा गुन्हा दाखल
भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, चौकशीचे आदेश

गणेश नाईक आणि आपण १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून आपल्याला त्यांच्यापासून १५ वर्षांचा मुलगा असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. अनेक वर्षे आपल्याला काहीच करता आले नव्हते. आता माझा मुलगा मोठा झाला आहे. त्याच्या भविष्यासाठी संबंधित आमदाराच्या इतर मुलांप्रमाणेच त्यालाही मालमत्तेत समान वाटा मिळावा, असा आग्रह संबंधित महिलेने पोलिस व महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत धरला असल्याचे सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात आमदार गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

काय आहे नेमक प्रकरण?

1993 पासून आमदार गणेश नाईक एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची माहिती त्या महिलेने दिली आहे. ती म्हणते, या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही झाला आहे. गणेश नाईक यांनी महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. आमदार नाईक यांनी लग्नाचे आमिष आणि जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केले. या धमक्यांमुळे त्यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहावे लागत आहे. मुलाला पितृत्वाचा अधिकार मिळावा, आणि वैवाहिक अधिकार मिळावेत यासाठी मी सतत नाईक यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र गणेश नाईक यांनी या महिलेला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर गणेश नाईक यांचा मुलगा संदीपनेही या महिलेला गणेश नाईक यांच्याशी असलेले संबंध सोडून इतरत्र निघून जावे यासाठी या महिलेला व तिच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता, असा या महिलेचा आरोप आहे.

आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, बलात्काराचा गुन्हा दाखल
अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com