सीमाप्रश्‍नाच्या सुनावणीचा शरद पवारांकडून आढावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

बेळगाव - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी 23 जानेवारीस झालेल्या सुनावणीचा आढावा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी घेतला. साक्षीदारांच्या प्रतिज्ञापत्राबाबतही माहिती घेऊन विविध सूचना त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांच्या शिष्टमंडळाला केल्या.

कोल्हापूर येथे इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या पवार यांची म. ए. समितीच्या नेत्यांनी आज भेट घेतली. या भेटीत समिती शिष्टमंडळाने पवार यांना सीमाप्रश्‍नाच्या दाव्याच्या सुनावणीची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वेळी ज्येष्ठ विधिज्ञ हरीष साळवे यांनी केलेल्या युक्तिवादाची माहिती पवार यांनी घेतली. शिवाय साक्षीदारांच्या प्रतिज्ञापत्राबाबत काय चालले आहे, याचा आढावाही घेतला. सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: border dispute review by sharad pawar