दुष्काळी भागातील द्राक्षांचे मुंबईत ब्रॅंडिंग 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई - दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, यासारख्या संकटांवर मात करीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या द्राक्षमालाचे मुंबईत ब्रॅंडिंग व्हावे तसेच दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन शेतकरी ते थेट ग्राहक संपर्क निर्माण होऊन द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा व उत्तम प्रकारच्या द्राक्षांचा आस्वाद मुंबईकरांना घेता यावा या उद्देशाने द्राक्षभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबई येथे पहिल्यांदाच द्राक्षमहोत्सवाचे आयोजन आल्याची माहिती या महोत्सवाचे आयोजक अभिजित झांबरे यांनी दिली. 

बुधवारी 22 मार्च रोजी मनोरा आमदार निवास आवारात या महोत्सवाचे उद्‌घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये द्राक्षातील विविध जाती, त्यांची वैशिष्टये व आरोग्य विषयक फायदे याचा तपशील छायाचित्राच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. 

या महोत्सवात सांगली तसेच नाशिक, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील द्राक्षउत्पादकांनी पिकवलेली द्राक्षे ठेवण्यात येणार आहेत. त्यात तास-ए-गणेश, सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन, आरके, शरद सिडलेस यासह विविध जातींची द्राक्षांचा समावेश असणार आहे. या प्रदर्शनात उत्तम प्रकारची द्राक्षे मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहेत.