प्रचारासाठी भाजपची 'हायटेक वॉररुम' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

मुंबई -  राज्यभरातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी भाजपने "हायटेक वॉररुम' तयार केली आहे. प्रचार पद्धत, चर्चेतील मुद्दे यांचा अभ्यास करण्यात येत आहे. येथून नेत्यांना दररोज नवे मुद्दे, ताज्या घडामोडींचा तपशील दिले जात आहेत. 200 उच्चशिक्षित तरुण या "वॉररुम'मध्ये काम करीत आहेत. 

आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. प्रत्येक विधानसभेचे रेखांकन, त्यातील मतदारसंख्या, आधीची मतदान टक्‍केवारी, स्त्री-पुरुष प्रमाण यांची आकडेवारी तयार करून त्यानुसार प्रचाराचे नियोजन केले जात आहे. नेत्यांचे प्रचारदौरे, वस्तीनिहाय सभा यांचे नियोजनही वाररुममधून होत आहे. भाजपच्या प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी वाररुमचे नेतृत्व करीत आहेत. मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणीही वॉररुम तयार करण्यात आल्या आहेत. शिवसेना, कॉंग्रेसनेही अशा "वॉररुम' तयार केल्या आहेत.