केंद्रीय कर्मचाऱ्यांना जूनमध्ये खूशखबर! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना जूनपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार मोठा आर्थिक लाभ होणार आहे. त्यांच्या घरभाडे भत्यात (एचआरए) मोठी वाढ होणार आहे. आयोगाला मंजुरी मिळाल्यामुळे "एचआरए' जवळपास 48 हजारांवर जाईल. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात 15 दिवसांत प्रस्ताव पाठवला जाणार असून, तो लवकरच मंजूर होईल. 27 एप्रिलला अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थ खात्याचे सचिव अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सादर केला आहे. या अहवालाची "डिपार्टमेंट ऑफ एक्‍स्पेंडिचर' पडताळणी करणार आहे. त्यानंतर हा अहवाल सचिवांच्या समितीसमोर ठेवण्यात येईल. हे काम पूर्ण होण्यास 15 दिवस लागतील. सध्या देशात 43 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आहेत. यासोबतच 53 लाख निवृत्तीवेतनधारकही आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुविधा आणि बोनस दिला जात आहे; मात्र आता या सर्वांना सातवा वेतन आयोगानुसार सर्व सुविधा मिळतील.