.. हे शेतकरीविरोधी आंदोलन : चंद्रकांत पाटील

File photo of Chandrakant Patil
File photo of Chandrakant Patil

नागपूर : 'शेतकरी दूध ओतून देत नाहीत. खासगी व्यावसायिकांनी दूध दरात प्रति लिटरला तीन रुपये दर वाढवून दिला. त्यामुळे हे शेतकरी विरोधी आंदोलन आहे. सरकार हे चालू देणार नाही, अशी भूमिका सरकारतर्फे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केली.

पाटील यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ सुरू केला. त्यामुळे दोनदा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

राज्यात सर्वत्र दूध उत्पादकांचे आंदोलन आज सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, गणपतराव देशमुख, चंद्रहार नरके, जयंत पाटील यांनी दूध उत्पादकांची बाजू मांडली.

प्रति लिटर दुधासाठी उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली. गाईच्या दुधासाठी किमान तीस रुपये प्रति लिटरला द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. दूध भुकटी निर्यातीसाठी दिलेले अनुदान हे खासगी कंपन्यांसाठी असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com