छगन भुजबळ यांचा पुन्हा जामीन अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या अर्जावर "ईडी'ला उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र सदनासह अकरा प्रकरणांत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली छगन भुजबळ अटकेत आहेत. त्यातील 870 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी "ईडी'ने चौकशी करीत 27 एप्रिल 2016 रोजी सुमारे दहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात अन्य 31 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे; तर भुजबळ यांना इतर प्रकरणांत जामीन मंजूर झाला आहे. आता या प्रकरणात "ईडी' आणखी चौकशी करीत नसल्याने जामीन मंजूर करण्याची मागणी भुजबळ यांनी केली आहे.