फुकेंच्या विजयाने मुख्यमंत्र्यांचा दबदबा वाढला

सिद्धेश्‍वर डुकरे
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत दबदबा आणखी वाढला आहे. फुके हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केली होती. फुके यांच्या विजयाने नागपूरमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्‍का बसला आहे. फुके यांनी 220 मते घेतली. या मतदारासंघात तिरंगी सामना झाला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र जैन यांचे तगडे आव्हान होते.

जैन यांच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ताकदवार नेते प्रफुल्ल पटेल यांचे भरभक्‍कम बळ होते. तरीही फुके यांनी त्यांचा पराभव केला. पटेल यांना हा घाव वर्मी लागल्याचे बोलले जाते. तर फुके यांच्या विजयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सारी शक्‍ती पणाला लावली असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे भंडाऱ्यातील बुजुर्ग नेते आमदार गोपाळदास अग्रवाल यांनी पुत्र प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासाठी मेहनत घेतली. त्यांना 112 मते मिळाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची या निवडणुकीत आघाडी झाली नाही. त्याचा फायदा फुके यांना झाला असला, तरी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डावपेच कामी आल्याचे बोलले जाते.

जळगावची जागा राखली
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जळगाव जिल्ह्यात खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात उभा दावा ठाकला आहे. यातच खडसे यांचे विश्‍वासू समर्थक आणि विद्यमान आमदार गुरूमुख जगवानी यांचे तिकीट कापून महाजन यांचे समर्थक चंदू पटेल यांना तिकीट दिल्याने खडसे समर्थक गट नाराज होण्याची भीती होती. मात्र, तसे झाले नाही. जळगावची जागा भाजपने राखली.

महाराष्ट्र

सोलापूर - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून ऑनलाइन अर्ज भरण्यात राज्यात...

02.33 AM

सातारा -  ""मी स्वाभिमानी असून, मला कोणतीही गोष्ट मागायला आवडत नाही. आमच्या पक्षात आदेश मानला जातो. त्यामुळे पक्ष...

02.33 AM

मुंबई -  समृद्धी महामार्ग कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलेले "एमएसआरडीए'चे उपाध्यक्ष राधेश्‍याम मोपलवार...

01.36 AM