पसंतीच्या रुग्णालयातच भुजबळांवर ऍन्जिओग्राफी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

"जेजे'चे अधिष्ठाता डॉ. लहाने यांची माहिती

मुंबई :  तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जे. जे. रुग्णालयात ऍन्जिओग्राफी करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात ऍन्जिओग्राफी करण्याची त्यांची इच्छा असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. भुजबळ यांना ऑर्थर रोड तुरुंगात तूर्तास हलवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
हृदयाचे ठोके अनियमित असल्यामुळे भुजबळांना ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ऑर्थर रोड तुरुंगातून जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते.

यापूर्वीही अनेकदा भुजबळांना याच तक्रारीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी तपासण्याही केल्या. त्यासाठी सुमारे 20 दिवस भुजबळ खासगी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. तेथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांनी त्यांच्यावर ऍन्जिओग्राफी करण्याची आवश्‍यकता असल्याचे 27 नोव्हेंबरलाच तुरुंग प्रशासनाला कळवले आहे. भुजबळ यांना 7 डिसेंबरला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पाच दिवस उलटल्यानंतर त्यांनी ऍन्जिओग्राफी करण्यास नकार दिला. भुजबळ सांगतील त्या रुग्णालयात ऍन्जिओग्राफी करण्यात येईल, असे डॉ. लहाने म्हणाले.

महाराष्ट्र

मुंबई : आजच्या बैठकीत फक्त संघटनात्मक चर्चा होईल. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा आजच्या बैठकीत...

03.42 PM

नाशिक : कोपर्डीतील सामुहिक अत्याचार व खून प्रकरणातील संशयीत आरोपींनी विशेष सरकारी वकिलांची साक्ष घेण्याविषयी केलेली याचिका...

01.57 PM

मुंबई : काँग्रेस सोडून ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. अशा दलबदलू लोकांची पक्षाला गरज नाही. असे संधिसाधू पक्षांतर करीत...

10.54 AM