क्लासेसचा घडला मिरवणूक ते खून पॅटर्न!

The clash of classes from procession to murder pattern
The clash of classes from procession to murder pattern

लातूर : साधारणपणे तीस वर्षापूर्वी लातूर पॅटर्न राज्यात गाजू लागला, तेव्हापासून शहरात शिकवण्यांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली. गणेशोत्सवात जालनापूरकर सर मिरवणूक काढत, त्यात विद्यार्थी आणि इतर शिकवणीचालकही सहभागी होत. मात्र शिकवणीचे रुपांतर क्लासेसमध्ये होताना स्पर्धा सुरु झाली ती 2004 सालापासून. खासगी क्लासेसचे रुपांतर बिजनेसमध्ये होऊन काल अविनाश चव्हाण यांच्या खूनाच्या रुपाने तीव्र स्पर्धेने टोक गाठले.

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत लातूरचे विद्यार्थी राज्यात प्रथम येण्यास सुरुवात झाली, ती 34 वर्षापूर्वी दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या रुपाने. त्यावेळी राज्य गुणवत्ता यादीत राजर्षि शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची संख्या अधिक असे. तेव्हा शहरात शिकवण्या होत्या, त्या केवळ गणित आणि भौतिकशास्त्र विषयासाठी! इतर विषयांचेही खासगी वर्ग असत पण त्यांच्याकडे अगदी बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी असत. गणितासाठी जालनापूरकर सर आणि भौतिकशास्त्रासाठी उपासे सरांची शिकवणी अधिक प्रसिद्ध होती. तसे रजपूत, भोसले, भोगडे, बोंबडे या सरांचे क्लास प्रसिद्ध होतेच. तेव्हा गरीब विद्यार्थ्यांने एकदा सरांची भेट घेतली की वर्षे सहज निघे, फारसा बोभाटाही नसे.

याच काळात महाविद्यालयातील शिक्षकांनीही चोरून शिकवणी घेणे सुरु केले होते. पण ते इतरांच्या वेळांशी जुळते घेऊन विद्यार्थी आणि स्पर्धक दोघांशीही नाते जपत. अशा सौहार्द शिकवणीचे खऱया अर्थाने क्लासेसमध्ये रुपांतर झाले ते गुणवत्ता यादी जाहीर होणे बंद झाल्यापासून. इतर विषयांचे क्लासेसही वाढले आणि त्यांची फिसही पालकांना डोईजोड होऊ लागली. म्हणजे एका विषयाला अगदी दीडशे रुपयांपासून ते आता बावीस हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. 

पालकांचा आर्थिकस्तर आणि शिकविण्याचा दर्जा यानुसार फिस ठरण्याऐवजी संघनात्मक निर्णय होऊ लागला. त्याच वेळी अविनाश चव्हाण यांनी कमीतकमी दरांमध्ये उत्कृष्ट शिक्षकाचा क्लास विद्यार्थ्यांना उपलब्ध केला. मिळणारा प्रतिसाद पाहून इतर जिल्हयातील क्लासेसही आले. चव्हाण यांना मिळणाऱया प्रतिसादामुळेच इतरांनी संघटना बळकट केली. या स्पर्धेमुळे अविनाश चव्हाण विरुद्ध सगळे क्लासेस असे नकळत चित्र उभे राहिले. त्यात चव्हाणांनी पन्नास लाखांपर्यंत विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटली. त्यांना मिळणारा प्रतिसाद हीच स्पर्धा जिवघेणी ठरली. 
क्लासेसच्या बदलावर प्रा. उदय देवशटवार, प्राचार्य सुदर्शन खणगे यांनी सकाळकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com