शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी - मुख्यमंत्री

टीम इसकाळ
रविवार, 5 मार्च 2017

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात नाही. मात्र कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शाश्‍वत आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे हे आमचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेसोबतची युती राज्याच्या हितासाठी असल्याचे म्हणत आमच्या सरकारला शिवसेनेचा कायम पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई - राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात नाही. मात्र कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शाश्‍वत आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे हे आमचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेसोबतची युती राज्याच्या हितासाठी असल्याचे म्हणत आमच्या सरकारला शिवसेनेचा कायम पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढविल्या नाहीत. मात्र तरीही दोघांनाही यश मिळाले असल्याचे सांगत त्यामुळेच विरोधक निराश झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. भाजप आणि शिवसेनेवर जनतेने यावेळी विश्‍वास दाखविण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, विनोद तावडे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम, गिरीष महाजन, गिरीश बापट यांच्यासह अन्य काही मंत्री उपस्थित होते.

Web Title: CM Press Conference before Budget Session 2017