उद्या औरंगाबादच्या नामांतराची घोषणा होणार? संभाजीराजेंच्या पुतळ्यावरून चर्चा

CM Uddhav Thackeray may announce the renaming  Aurangabad as sambhajinagar at Shiv Sena meeting
CM Uddhav Thackeray may announce the renaming Aurangabad as sambhajinagar at Shiv Sena meeting esakal

औरंगाबाद : उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद शहरात शिवसेनेच्या जंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान उद्या होणार्‍या या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेत औरंगाबादच्या नामांतराची घोषणा करू शकतात. (CM Uddhav Thackeray Aurangabad visit)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या औरंगाबाद येथील सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजच्या समोर पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा पुर्ण आकृती पुतळा ठेवण्यात आला आहे. या पुतळ्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा अशी मागणी सुरू आहे, तसेच या मागणीवरून राजकारण देखील केले जात आहे, त्यामुळे उद्या मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

CM Uddhav Thackeray may announce the renaming  Aurangabad as sambhajinagar at Shiv Sena meeting
'माविआ'चं टेन्शन वाढलं; देशमुख, मलिकांच्या मतदानाला ईडीचा विरोध

स्टेज समोर लावण्यात आलेल्या संभाजीराजेंच्या पुर्ण आकृती पुतळ्याबद्दल विचारले असता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, संभाजी महाराजांचा पुतळा तर राहाणारचं कारण हे संभाजीनगर आहे असे सांगितले. औरंगाबादच्या नामांतराचे अधिकृत घोषणा होणार का असे विचारले असता, त्यांनी याबद्दल थेट उत्तर देणं टाळलं.

CM Uddhav Thackeray may announce the renaming  Aurangabad as sambhajinagar at Shiv Sena meeting
दूरदर्शनचा चेहरा हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदन प्रदीप भिडे यांचं निधन

उद्या मुख्यमंत्री ठाकरे कोणाला उत्तरं देणार असे विचारले असता खैरे म्हणाले की, केंद्रात जे सुरू आहे तसेच काश्मीरमध्ये होत असलेल्या पंडीतांच्या हत्यांवर बोलतील असे त्यांनी सांगितले. उद्याची उत्सुकता आहे, तो साहेबांचा प्रश्न आहे, ते निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे असे खैरे यावेळ म्हणाले. दरम्यान या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेमकं काय बोलतील याकडे सगळ्याचे लक्ष असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com