राज्यात आजपासून CNG, PNG झाला स्वस्त; वाचा नवे दर

देशातील प्रदुषण कमी व्हावे यासाठी केंद्रासह राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
ajit pawar
ajit pawaresakal
Summary

देशातील प्रदुषण कमी व्हावे यासाठी केंद्रासह राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

मुंबई - देशातील पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसमध्ये दरवाढ होत असतानाच राज्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे काही वाहन चालक आनंदित झाले आहेत. सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कर (व्हॅट) कमी करण्याचा निर्णय अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केला होता. त्यानुसार कर प्रणालीत बदल करण्यात येत आहे.

ajit pawar
शेलारांच्या ट्विटची BMCनं घेतली दखल! २४ तासांच्या आत उचलली पावलं

महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तसेच पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असणार आहे.

दरम्यान, देशातील प्रदुषण कमी व्हावे यासाठी केंद्रासह (Centrak Govt.) राज्य सरकार प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिक व सीएनजीवर भर दिला जात आहे. यातून प्रदुषण पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्यात येत आहे. तर राज्य सरकारने सीएनजीचा वापर वाढावा यासाठी सीएनजीवरील कर कमी केला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. या निर्णयाचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. पुणे, मुंबई, नागपूर सारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील काही छोट्या शहरांतही सीएनजी वाहने खरेदी करण्याचा कल वाढला आहे.

ajit pawar
'उकेंवरील कारवाई म्हणजे कॉंग्रेस अन् नाना पटोलेंच्या बदनामीसाठीचं षडयंत्र'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com