सीएनजी सहा रुपयांनी स्वस्त

राज्य सरकारने सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) १० टक्क्यांनी कमी केल्याने त्याच्या दरात प्रतिकिलो ६.३० रुपयांची घट झाली.
CNG gas
CNG gasSakal
Summary

राज्य सरकारने सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) १० टक्क्यांनी कमी केल्याने त्याच्या दरात प्रतिकिलो ६.३० रुपयांची घट झाली.

पुणे - राज्य सरकारने (State Government) सीएनजी इंधनावरील (CNG Fuel) मूल्यवर्धित कर (व्हॅट) १० टक्क्यांनी कमी केल्याने त्याच्या दरात प्रतिकिलो ६.३० रुपयांची घट (Decrease) झाली. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आता सीएनजी प्रतिकिलो ६२.२० रुपयांना मिळणार आहे. परिणामी सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजीवरील व्हॅट १३.५ टक्क्यांवरून तीन टक्के इतका कमी करण्याचे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केले होते. त्यांची अंमलबजावणी गेल्या १ एप्रिलपासून सुरु झाल्याने सीएनजीचे दर कमी झाले आहेत.

सीएनजी तयार करण्यासाठी स्थानिक आणि आयात केलेले दोन प्रकारचे गॅस वापरण्यात येतात. आयात केलेल्या गॅसची किंमत गेल्या काही दिवसांत वाढली आहे, तर स्थानिक गॅसचीदेखील कमतरता आहे. त्यामुळे येत्या काळात सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

- दीपक सावंत, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com