महसूल वाढविण्यासाठी समितीची स्थापना

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 एप्रिल 2017

मुंबई - विकासकामे करण्यासाठी पुरेसा पैसा तिजोरीत असणे गरजेचे असते; मात्र व्याज आणि कर्जे याचा भार वाढू लागल्यावर महसूलवाढीचे सर्व पर्याय सरकारला तपासावे लागतात. महसुलात वाढ झाली, तर विकासकामांसाठी हाती पैसा येऊ शकतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महसूलवाढ करण्यासाठी वित्त विभागाने एक समिती स्थापन केली आहे. वित्त खात्याचे अपर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन हे या समितीचे अध्यक्ष आहेत. गृह, महसूल, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, नगर विकास आदी विभागांचे सचिव आहेत. ही समिती दर बुधवारी राज्याच्या महसूलवाढीसंदर्भात बैठक घेऊन चर्चा करतील. याचा आढावा अर्थमंत्री घेतील.