एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रि‍पदाला कॉंग्रेसचा पाठिंबा - नाना पटोले

Congress nana patole said congress will not oppose shivsena  if eknath shinde becomes chief minister
Congress nana patole said congress will not oppose shivsena if eknath shinde becomes chief minister

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि माहाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे, यादरम्यान सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. या मध्येच कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी कॉंग्रेस पक्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत हरकत घेणार नाही असे सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना बंड केलेल्या आमदारांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर खुर्ची सोडायला ते तयार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे नेत नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा आहे. जर ठाकरे त्यांच्या पक्षातील कोणाला मुख्यमंत्री करत असतील आणि त्यांनी महाविकास आघाडीची मदत मागीतली तर आम्ही सोबत आहोत.

Congress nana patole said congress will not oppose shivsena  if eknath shinde becomes chief minister
उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेना अडचणीत?

पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या पक्षासोबत जर जाण्याचा निर्णय घेतला तर आमची काही जबरदस्ती नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत मार्ग आहे. ते त्याच्या परिवाराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत. भाजपला रोखण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. सरकार तयार झालं तेव्हा महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे यांना योग्य वाटलं, आता त्यांना वाईट वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे पटोले म्हणाले. काय निर्णय घ्यायचा तो शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यांच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

Congress nana patole said congress will not oppose shivsena  if eknath shinde becomes chief minister
CM ठाकरेंच्या संवादानंतर राऊतांचे ट्वीट; म्हणाले, होय..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com