तुरुंगात पंचतारांकित सुविधांचा आरोप खोडसाळपणे - भुजबळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - आर्थररोड तुरुंगात 14 महिन्यांपासून कैदेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देणारे पत्र पाठविले. भुजबळ यांनी दमानिया यांचे सर्व आरोप निव्वळ खोडसाळ असल्याचे प्रत्युत्तर दिले. 

तुरुंगात भुजबळ यांना पंचतारांकित सुविधा मिळत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. यामध्ये भुजबळांसाठी भिंतीएवढा टीव्ही संच, फळे, मद्य, चिकन मसाला सातत्याने दिला जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. यावर कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. 

तुरुंगात सर्व कैद्यांसाठी सामुदायिक टीव्ही संच असून तो केवळ दीड फुटाचा आहे. त्यावर फक्त दूरदर्शनचेच कार्यक्रम दाखविले जातात. याशिवाय कारागृहातील उपाहारगृहात फळे ठेवलेली असतात. प्रत्येक कैदी आपापल्या परीने ती फळे विकत घेऊ शकतो. कारागृहाच्या नियमाप्रमाणे सर्वत्र शेकडो सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. यामध्ये कोण भेटायला येते, कुठल्या वस्तू येतात हे स्पष्ट दिसते. त्यावर कारागृह प्रशासनाचे बारकाईने लक्ष असते. न्यायालयाच्या परवानगीने प्रत्येक कैद्याला वकील भेटू शकतात. मला न्यायालयाच्या परवानगीनेच घरचे जेवण मिळते. त्यामुळे दमानिया यांनी केलेले सर्व आरोप हे सूडबुद्धीचे आहेत. आम्हाला जामीन मिळू नये, रुग्णालयात उपचार मिळू नयेत यासाठी ठराविक कार्यकालाने आमच्या विरोधात खोट्या बातम्या पसरविल्या जातात. आमचे विरोधक आमच्या जिवावरच उठले आहेत हे यातून स्पष्ट होते, अशी भूमिका भूजबळ यांनी पत्रात मांडली आहे. 

यापुढे भुजबळ म्हणतात की, अंजली दमानिया यांनी हे सर्व करण्याचे कंत्राटच घेतले आहे. निव्वळ बदनामी करायची, मीडियाच्या द्वारे न्यायव्यवस्थेवर विपरित परिणाम घडवायचा यासाठी दमानिया हे सर्व करत आहेत, असा आरोपही भुजबळ यांनी पत्रात केला आहे. दमानिया यांच्या या आरोपासंदर्भात वकिलाचा सल्ला घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही भुजबळ यांनी पत्रातून दिला आहे.