फळपीक विमा योजनेला मुहूर्त कधी? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

जळगाव (प्रतिनिधी) ः राज्यातील फळपिकांना विविध हवामान घटकांपासून विमा संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून हवामान आधारित फळपीक विमा योजना दरवर्षी साधारण हिवाळ्यापासून राबविली जाते. यंदा फळपीक विमा योजना राबविण्याच्या बाबतीत कृषी विभागाकडून आतापर्यंत कोणतीही हालचाल झालेली नाही. आॅक्टोबर महिना संपला तरी काहीच कार्यवाही झालेली नसल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

जळगाव (प्रतिनिधी) ः राज्यातील फळपिकांना विविध हवामान घटकांपासून विमा संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून हवामान आधारित फळपीक विमा योजना दरवर्षी साधारण हिवाळ्यापासून राबविली जाते. यंदा फळपीक विमा योजना राबविण्याच्या बाबतीत कृषी विभागाकडून आतापर्यंत कोणतीही हालचाल झालेली नाही. आॅक्टोबर महिना संपला तरी काहीच कार्यवाही झालेली नसल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

गारपीट, वादळ, अतिवृष्टी, तापमानातील चढ-उतार तसेच वेगाने वाहणारे वारे आदी हवामान घटकांमुळे केळी, द्राक्ष, डाळिंब या फळपिकांचे नुकसान झाल्यास संबंधित उत्पादकांना भरपाई देण्याची तरतूद हवामान आधारित फळपीक विमा योजनेत असते. त्या अनुषंगाने राज्यातील बहुतांश सर्व फळबागायतदार शेतकरी फळपीक विमा योजनेत सहभागीसुद्धा होतात. एकट्या जळगाव जिल्ह्यातील सुमारे ३५ हजारापेक्षा जास्त केळी उत्पादक फळपीक विमा योजनेत दरवर्षी सहभागी होतात. गेल्या वर्षीही ३६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हेक्टरी सरासरी ५८०० रुपयांप्रमाणे सुमारे २१ कोटी १२ लाख रुपयांचा विमा हप्ता भरून आपला सहभाग नोंदविला होता. त्यानुसार यंदाही शेतकऱयांकडून फळपीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा केली जात आहे. थंडीचा कालावधी सुरू झाल्याच्या स्थितीत केळीबागांच्या नुकसानीपासून भरपाई मिळण्याच्या आशेने अनेक शेतकरी कृषी विभागाकडे विमा योजनेबाबत विचारणाही करू लागले आहेत. 
 
‘कमी तापमानाची भरपाई वाढवा’ 
गेल्या वर्षी हवामान आधारित फळपीक विमा योजना मुळात थोडी उशिरा राबविण्यात आली होती. विशेष म्हणजे कमी तापमानामुळे होणाऱ्या नुकसानीचा विमा संरक्षण कालावधी हा एक डिसेंबर ते २९ फेब्रुवारी दरम्यानचा गृहीत धरलेला होता. सलग तीन दिवस आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिल्यास प्रतिहेक्टरी सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद असताना, प्रत्यक्षात संबंधित शेतकऱ्यांना निकषात बसल्यानंतर खूपच कमी भरपाई जाहीर झाली. यंदा गेल्या वर्षीप्रमाणे भरपाई मिळणार असेल तर विमा योजनेत सहभागी होऊन उपयोग तरी काय आहे, असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. कमी तापमानामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई ठरलेल्या रकमेप्रमाणे मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

हवामान आधारित फळपीक विमा योजना चुकीच्या हवामान नोंदी, अंमलबजावणीत चालढकल, भरपाई जाहीर करण्यात विलंब, नुकसानीच्या तुलनेत खूपच कमी भरपाई आदी कारणांनी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. केळी उत्पादकांसाठी तर ही विमा योजना नेहमीच फसवी ठरलेली आहे. 
- गोकूळ पाटील, केळी उत्पादक, चांगदेव, जि. जळगाव 
 

Web Title: crop insurance scheme uncertain