तृतीयपंथीयांना दगडूशेठ गणपतीच्या महाआरतीचा मान

Dagadusheth Ganapati Pooja By Transgenders In Pune
Dagadusheth Ganapati Pooja By Transgenders In Pune

पुणे : सध्या कलम 377 बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे. 'समान हक्क, समान अधिकार हे स्त्री पुरुषांप्रमाणेच तृतीयपंथीयांनाही आहेत', हे सांगणारा हा निर्णय समाजात हळूहळू बदल घडवून आणत आहे असे नुकताच दिसून आले. निमित्त होते गणेशोत्सवाचे. पुण्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर येथे तृतीयपंथीयांच्या हस्ते महापुजा पार पडली.

'आम्हीही या समाजाच एक भाग आहोत आणि लोकांनी आम्हाला तशी वागणूक द्यायला हवी. आम्हालाही सन्मानं जगण्याचा अधिकार आहे.' असं साकडंच तृतीयपंथीयांनी गणपती चरणी घातलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या 126 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात शंभरहून अधिक तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत शंभरहून अधिक तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीची पुजा केली. यावेळी गणेश पेठेतील मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या रंजिता नायक, लता नायक, शोभा नायक, दगडूशेठ ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, हेमंत रासने यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com