गावी जाणे बंद

Himmat-Varma
Himmat-Varma

मुंबई सगळ्यांना पोसते म्हणून हातावर पोट घेऊन मुंबईत आलेले हिम्मत वर्मा यांना रोज अर्धपोटीच झोपावे लागत आहे. महागाईने इतके बेहाल केले, की त्यांनी गावी जाणेच बंद केले आहे. त्यामुळे ते अल्प उत्पन्न गटाचे प्रतिनिधित्व करतात. गेली १२ वर्षे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे बोरिवलीतील हिम्मत वर्मा यांच्यासाठी जिकिरीचे झाले आहे. रिक्षा देखभाल खर्च, सीनएनजी गॅस दरवाढ आणि महागाईने हिम्मत वर्मांपुढे मुलांचे शिक्षण आणि बचतीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नाव : हिम्मत रामगणेश वर्मा
वय : ३४
धंदा : रिक्षाचालक
कुटुंब : पत्नी आणि तीन मुले
उत्पन्न गट : अल्प उत्पन्न गट

एकमेव कमावती व्यक्ती
मासिक उत्पन्न - सरासरी १२ हजार रुपये 
रिक्षा चालवून दररोज उत्पन्न - ४०० रुपये

‘सीएनजी’ दरवाढीने उत्पन्नाचा घास हिरावला
गेल्या वर्षभरात सीएनजी गॅसच्या दरात प्रती किलोमागे सहा ते आठ रुपयांची वाढ झाली आहे. सीएनजी ४५ रुपये असून, वर्मांना सीएनजीसाठी दररोज १८० रुपये खर्च येतो. यापूर्वी ‘सीएनजी’साठी दररोज १२० रुपये खर्च येत होता. दरवाढीमुळे वर्मांना ‘सीएनजी’साठी १५०० ते १८०० रुपये जादा खर्च करावे लागत आहे. ‘सीएनजी’दरवाढीमुळे वर्मांच्या कमाईवर परिणाम झाला आहे.

रेल्वेचे तिकीट महागले, गावाला रामराम 
रेल्वे तिकीट दरात वाढ झाल्याने वर्मा यांचे कुटुंबीय यंदा गावी गेले नाही. गेल्या वर्षी रेल्वेचे तिकीट ५०० रुपये होते. यंदा मात्र ते थेट ६५० रुपये झाल्याने कुटुंबीयांना घेऊन जाणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे यंदा गावी आपल्या वृद्ध आई-वडिलांची भेट होणार नाही, याची खंत वर्मा यांच्या चेहऱ्यावर दिसून आली.

खर्च कमी करण्यासाठी उपाय
मांस, मटण, माशाचे भाव गगनाला भिडल्याने मांसाहार कमी केला आहे. सहा महिन्यांपासून निम्मा मांसाहार कमी केला असून, महिन्यातून एक वेळ मांसाहार केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com