कर्जमाफीसाठी अन्य राज्यांच्या मॉडेलचा अभ्यास - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांच्या मॉडेलचा अभ्यास राज्य सरकार करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. 

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांच्या मॉडेलचा अभ्यास राज्य सरकार करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. 

विधानसभेत सदस्य शंभूराज देसाई, आशीष देशमुख, सुभाष साबणे, डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी केली. यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील 31 लाख शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे. त्यांना कर्जातून बाहेर काढून पुन्हा कर्ज मिळावे यासाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे. उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज मी वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा केली आहे. वित्त सचिवांना उत्तर प्रदेशच्या मॉडेलचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात तक्ता तयार करायलाही सांगितले आहे. राज्य सरकार कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यास सक्षम आहे. कर्जमाफी घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य वेगवेगळ्या राज्यांच्या मॉडेलचाही अभ्यास करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडेही मागणी करण्यात आली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.