मुंबईत रिक्षाच्या धडकेत हरणाचा मृत्यू; रिक्षाचालक जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

गोरेगावातून जाणाऱ्या महामार्गाजवळ वेगात असलेल्या रिक्षाने धडक दिल्याने आज (शुक्रवार) पहाटे एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई : गोरेगावातून जाणाऱ्या महामार्गाजवळ वेगात असलेल्या रिक्षाने धडक दिल्याने आज (शुक्रवार) पहाटे एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

वेगाने जात असलेल्या रिक्षाच्या समोर अचानक हरण आले. त्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकही जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली आणि रिक्षाचालकासह हरणालाही रुग्णालयात दाखल केले. हरणाच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. महामार्गालगत असलेल्या जंगलातून नेहमीच प्राणी रस्त्यावर येतात. हरण अचानक रस्त्यावर आल्याने हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.