विकासकामे रखडली 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार याबाबत रंगलेली चर्चा याचा प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जनतेची विकासकामे रखडली आहेत. 

मुंबई - राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार याबाबत रंगलेली चर्चा याचा प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जनतेची विकासकामे रखडली आहेत. 

आचारसंहिता लागू असल्याने सध्या प्रशासकीय कामकाज धिम्या गतीने सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेत महसूल खात्याचे वरिष्ठ अधिकारी गुंतून पडले असल्याने दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावरील हे महसूल अधिकारी निवडणुकीच्या कामात सहभागी झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय होत नाहीत. जनतेच्या जिव्हाळ्याची कामे रखडली जात आहेत. त्यातच शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यामुळे सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार का? अशी चर्चा सरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते, मंत्री सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांच्यात चलबिचल सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार, अशी अटकळ बांधली जात आहे. यामुळे प्रशासकीय अधिकारी राजकीय घडोमोडींवर चर्चा करत असून, नेमके कसे चित्र असेल याबाबत ते अनभिज्ञ आहेत. या अधिकाऱ्यांचा उत्साह मावळला आहे. 

Web Title: development firm