'गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न मी सत्तेत बसून पूर्ण करतोय'; धनंजय मुंडे

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतीदिन
धनंजय मुंडे
धनंजय मुंडेसकाळ

आज भाजपाचे दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन. ३ जून २०१४ रोजी त्यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनाला आज आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या स्मृतीदिनी राज्यातील सर्व राजकारण्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहत भावूक पोस्ट केली आहे.

(Gopinath Munde Death Annivarsary)

दरम्यान ते गोपीनाथ गडावर आदरांजली वाहण्यासाठी आले असताना "गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न मी सत्तेत बसून पूर्ण करत आहे. ते नसते तर आज चित्र वेगळं असतं." अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर "त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. त्यांचा आवाज आजही कानात घुमतो आहे." असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. ट्वीट करत ते म्हणाले की, "अजूनही आठवतो तो 3 जूनचा काळा दिवस... आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर..." अशी भावनिक पोस्ट करून त्यांनी आपले चुलते गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. "अप्पा तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो!" असं म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे.

धनंजय मुंडे
मुंबई-पुणे प्रवास आता अडीच तासात; महाराष्ट्राला पहिली 'वंदे भारत' ट्रेन

दरम्यान २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला महाराष्ट्रात भरघोस यश मिळालं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकानंतर भाजपा आणि शिवसेना युतीने महाराष्ट्रात यश मिळवलं होतं. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं जात होतं. पण त्याआधी गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री म्हणून दिल्लीत शपथ घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्रात परत येत असताना दिल्लीत त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या घटनेला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com