ध्वनिप्रदूषण तक्रारदारांची ओळख उघड करू नका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रारी दाखल करणाऱ्या तक्रारदारांची ओळख उघड न करता ती सुरक्षित ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले. 

मुंबई - ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रारी दाखल करणाऱ्या तक्रारदारांची ओळख उघड न करता ती सुरक्षित ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले. 

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकार व पोलिस विभागाला निर्देश दिले आहेत. याबाबत करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. ध्वनिप्रदूषणाची तक्रार शीव पोलिस ठाण्यामध्ये करणाऱ्या एका तक्रारदाराचे नाव माहिती अधिकाराच्या तपशिलात उघड झाल्याचे आज न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तक्रार करणाऱ्या नागरिकांची ओळख उघड न होण्याची पुरेशी खबरदारी पोलिसांनी घ्यायला हवी. तसे झाले तरच नागरिक तक्रारीसाठी पुढे येतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. 

Web Title: Do not reveal the identity of the noise pollution complainant state government high court