५६ वर्षात कशी बदलली शिवसेना?

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काही फरक आहे का?
shivsena
shivsenasakal

५६ वर्षात कशी बदलली शिवसेना?

आताची राजकीय परिस्थिती पाहता असे स्पष्ट दिसते की शिवसेनेत बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक गट म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट. हे दोन्ही नेते स्वतःला सच्चा शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्के भक्त असल्याचे सांगत आहेत. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचे एक वक्तव्यही समोर आले होते. त्यात ते म्हणाले होते की, 'मला सतत बंडखोर म्हटले जात आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे भक्त, आम्ही शिवसैनिक आहोत (do you know the 56 years of journey of shivsena)

शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, "आम्ही बाळासाहेबांचे खंबीर शिवसैनिक आहोत. आम्ही सत्तेसाठी फसवणूक केली नाही आणि करणारही नाही." तर या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचेही प्रत्युत्तर आले. ते म्हणाले, 'शिवसेना जशी बाळासाहेब ठाकरेंच्या काळात होती तशीच आहे.'

यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्यात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कशी होती? त्याची सुरुवात कशी झाली? मराठी माणुस हा शब्द धरुन बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट कसे झाले? बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काही फरक आहे का? या सगळ्याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.

shivsena
पुण्यात शिवसेना फुटली; वरिष्ठ पदाधिकारी शिंदेंच्या गटात जाणार

शिवसेनेची सुरुवात कशी झाली ?

१९ जून १९६६ या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या नव्या राजकीय पक्षाची पायाभरणी केली होती. शिवसेनाची स्थापना होण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे हे एका इंग्रजी वृत्तपत्रात व्यंगचित्रकार होते. मराठी भाषिकांसाठी वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी त्यांच्या वडिलांनी आंदोलन केले होते.

पुढे त्यांनी मुंबईमध्ये इतर राज्यातून येणाऱ्या लोकांची वाढती संख्या पाहता बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ नावाचे वृत्तपत्रही सुरू केले. आणि परप्रांतीयच्या मुद्दावर बाळासाहेबह वृत्तपत्रात भरपूर लिहु लागले. शिवसेना स्थापनेवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी '८०% समाजकारण आणि २०% राजकरण' असा नारा दिला होता.

shivsena
Maharashtra Politics : सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला

मुंबईत मराठी माणसांची संख्या जास्त होती पण नोकरी, व्यापार आणि धंदा यामध्ये गुजराती लोक ,दक्षिण भारतीयांचे वर्चस्व होते. त्यामुळे मराठी माणसांच्या सगळ्या नोकऱ्या दक्षिण भारतीय घेतात असा दावा बाळासाहेबांनी केला. याविरोधात त्यांनी आंदोलन सुरू करत 'पुंगी बजाओ आणि लुंगी हटाओ'चा नारा दिला. हळुहळू शिवसेना राजकारणात सक्रिय होऊ लागली. आणि शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्रात मजबूत ओळख निर्माण केली.

shivsena
एकनाथ शिंदे शरद पवारांच्या वाटेवर जात आहेत का?

बाळासाहेब ठाकरे हे सतत मराठी माणसाबद्दल बोलत असत. त्यामुळे त्या काळात अनेक अमराठी लोकांवर अनेक हल्ले झाले होते मात्र, तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर शिवसेनेने आपली छाप निर्माण केली होती. यासोबतच शिवसेनेने आपल्या विचारधारेत मराठी माणसांसोबत हिंदुत्वाचाही समावेश केला, तो काळ होता १९८०, १९९० चा. संपूर्ण देशात राम मंदिराच्या राजकारणावरून वातावरण तापले होते. याचाच फायदा घेत शिवसेना चांगलीच सक्रिय होऊ लागली.

पुढे मग शिवसेनेने हिंदुत्वाच्या जोरावर राजकारणात आपले नवे स्थान निर्माण केले .१९८७ मध्ये मुंबईतील विलेपार्ले विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने पहिल्यांदा 'गर्व से कहो हम हिंदू हैं'चा नारा दिला होता. हिंदुत्वाच्या नावावर मते मागितल्याबद्दल निवडणूक आयोगाने ठाकरे यांचा सहा वर्षांसाठी मतदानाचा हक्क काढून घेतला होता. ही शिवसेनेची पहिलीच विधानसभा निवडणूक होती.

shivsena
आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलोय हा गैरसमज - दीपक केसरकर

पुढे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती पहिल्यांदाच झाली होती. त्यानंतर ही युती बराच काळ टिकली. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने १८३ जागा लढवून ५२ जागा जिंकल्या, तर भाजपने १०४ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले.

त्यानंतर १९९५ ला देखील भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र निवडणूक लढवली. शिवसेनेचे ७३, भाजपचे ६५ उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. दोघांच्या युतीने सरकार स्थापन केले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.

२००४ च्या निवडणुकीत शिवसेनेला ६२ तर भाजपला ५४ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजपने शिवसेनेलाही मागे टाकले,या आधी महाराष्ट्रात शिवसेना हा नेहमीच मोठा पक्ष राहिला आहे, तर भाजप हा छोटा पक्ष राहिला होता.पण २००९ मध्ये उलटच घडले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्या, पण भाजपला पहिल्यांदाच शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यानंतर भाजपने ४६ तर शिवसेनेने ४५ जागा जिंकल्या.

shivsena
Maharashtra Politics LIVE: स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा - उद्धव ठाकरे

पुढे दुदैवाने १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.आणि शिवसेनेची सगळी सुत्रे आपोआप उद्धव ठाकरेच्या हाती आली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील अंतरही वाढले आहे. हा काळ होतो २०१४ चा १९८९ नंतर जेव्हा दोन्ही पक्ष पहिल्यांदा वेगळे झाले. शिवसेनेने सर्व २८८ जागा लढवल्या, मात्र शिवसेनेला केवळ ६३ जागा मिळाल्या. त्याचवेळी भाजपचे १२२ उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. निकालानंतर दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा युती झाली आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर २०१९ आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युती केली. भाजपने २५ तर शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढवली होती. भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. मग शिवसेनेच्या कोट्यातील एका खासदाराला मंत्री करण्यात आले. मात्र, काही दिवसांनी विधानसभेची निवडणूक झाली.

भाजपने १०५ आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. मग शिवसेनाप्रमुखांनी अडीच वर्षांच्या सरकारचा फॉर्मेट दिला. म्हणजे भाजप अडीच वर्षे आणि शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्री असेल. मात्र, भाजपने ही ऑफर धुडकावून लावल्याने दोघांमधील युती पुन्हा तुटली. नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून युती केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com