डॉ. आंबेडकर स्मारकाला 14 एप्रिलचा मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास 14 एप्रिलपूर्वी प्रारंभ करावा, त्यासाठी सर्व तांत्रिक अडचणी सोडवून आवश्‍यक परवानगी मिळवाव्यात, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीपर्यंत इंदू मिल येथे स्मारकाच्या कामास सुरवात करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले. 