डॉ. आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षांत पूर्ण करणार - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई - इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असून ते 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नियोजित स्मारकाच्या परिसराला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. 

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान, स्मारकाचे वास्तूविशारद शशी प्रभू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. 

स्मारकाच्या कामाचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्यदिव्य असे स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाच्या उंचीमुळे वांद्रे-वरळी सी-लिंकवरूनदेखील दर्शन घेता येईल. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाचे काम कालबद्ध पद्धतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यसरकारने घेतलेले निर्णय 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथे वास्तव्य असलेल्या इमारतीचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रुपांतर. 
- जपानमधील कोयासन विद्यापीठात डॉ. आंबेडकरांचा पुतळा. 
- चैत्यभूमी व दीक्षाभूमीला "अ'वर्ग तीर्थस्थळ व पर्यटनस्थळाचा दर्जा. 
- बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित 50 स्थळांचा गतिमान विकास सुरू. 
- डॉ. आंबेडकरांच्या समग्र साहित्याचे पुनर्प्रकाशन. 
- अनुसूचित जातीमधील विद्यार्थी-महिलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 
- दहावी-बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी जिल्हास्तरावर वर्षाला 48 हजार, शहरी भागात 60 हजार अनुदान. 
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षांसाठी औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे मोफत निवासी प्रशिक्षण. 
- बार्टीकडून गेल्या तीन वर्षांत 18 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण. त्यापैकी 11 हजार विद्यार्थ्यांना रोजगार. 

Web Title: Dr. Ambedkar memorial to be completed in two years - CM