मोर्चांमुळे कोणाचे मुख्यमंत्रीपद गेले नाहीl:सेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

मुंबई - मराठा मोर्चे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून आपल्याला काढण्याचा कट असल्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर ती त्यांची हतबलता आहे. एखाद्या समाजाने त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे काढले म्हणून कुणाला मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले नाही, असे शिवसेनेने "सामना‘तील अग्रलेखातून म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना सावध करत "खुर्चीला स्वकियांकडूनच सुरुंग लावले जात नाहीत ना याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल‘, असा सल्लाही दिला आहे.

महाराष्ट्रातील अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मोर्चातील सहभागाबाबत भाष्य करताना अग्रलेखात म्हटले आहे की, "दानवे यांच्या सहभागामुळे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे की हा सर्व प्रकार त्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आहे.‘ तसेच "मराठा मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्रात निर्माण झालेली अस्वस्थता मुख्यमंत्री फडणवीस कशी दूर करणार? मराठा मोर्चे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून आपल्याला काढण्याचा कट असल्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर ती त्यांची हतबलता आहे. एखाद्या समाजाने त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढले म्हणून कुणाला मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले नाही. मात्र खुर्चीला स्वकियांकडूनच सुरुंग लावले जात नाहीत ना याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल‘, असे अग्रलेखात म्हटले आहे. मोर्चामागे राजकारण असल्याचे म्हणत शरद पवार यांच्या भूमिकेवरही अग्रलेखातून टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे

"मराठा समाजाचे मोर्चे म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे डावपेच दिसतात. दगड भिरकावले आहेत. कुणाकुणाची कपाळे फुटतात ते लवकरच दिसेल.‘, अशा शब्दांत अग्रलेखाचा समारोप करण्यात आला आहे.