राज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट

intelligent traffic management
intelligent traffic management

मुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली.

मुंबई परिवहन विभाग व वाहतूक पोलिस विभागाच्यावतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'गेल्या तीन वर्षांत राज्यातील रस्ते अपघातांच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, अपघात कमी करण्यासाठी सुधारणेस आणखी वाव आहे. परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी आणखी प्रयत्न व जाणीव जागृती तसेच नवनवीन उपक्रम राबवावेत. "ऑर्टिफिशियल इंटलिजन्स'च्या माध्यमातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतूक यांचा अभ्यास करून त्याचे विश्‍लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्‍य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षा पंधरवडा हा फक्त साजरा न करता यातून सुरक्षित प्रवासासाठी लोकप्रबोधन व जागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

भावी प्रकल्प
- नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी यंत्रणा
- पुणे - मुंबई महामार्गावरही अशी यंत्रणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com