न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगतोय : एकनाथ खडसे

Eknath Khadse said suffering from untimely crime
Eknath Khadse said suffering from untimely crime

नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड सांगावे. न केलेल्या अपराधाची शिक्षा मी भोगतोय,'' असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज केला. 

"ओबीसी फाउंडेशन इंडिया' संस्थेतर्फे केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या उमेदवारांना "समाजभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. 

खडसे म्हणाले, "ओबीसींची लोकसंख्या स्पष्ट नाही. त्यासाठी जातनिहाय जणगणना झाल्यास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देता येईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा सल्ला दिला. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्‍का लागला, तर सरकारविरोधात प्रथम मी रस्त्यावर उतरेन. मराठा समाजाला आरक्षणास विरोध नाही; मात्र हे आरक्षण स्वतंत्र असावे.'' 

धनगर आरक्षणाचा शब्द पाळा 
"तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंढरपूर येथे 2002 मध्ये धनगर समाजाला "एसटी' आरक्षण भाजप मिळवून देईल, असे म्हटले होते. बारामती येथे 2013-14 मध्ये झालेल्या धनगर समाजाच्या उपोषणादरम्यान विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आरक्षणाचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आता धनगर समाजाला "एसटी'चे आरक्षण द्यायला हवे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com