रविवारीही स्वीकारणार उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून वरील दोन्ही दिवशी सकाळी अकरा ते दुपारी तीन या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात यावेत, असे आदेश आज राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

नाशिक - राज्यातील दहा महापालिका व जिल्हा परिषद यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कमी कालावधीअभावी उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून सुटीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची सोय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

यामुळे 29 जानेवारी व 5 फेब्रुवारी या सुटीच्या दिवशीही उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत. राज्यातील पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा, 165 पंचायत समित्या व दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी आहे. दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी 1 ते 6 फेब्रुवारी काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.

या दोन्ही टप्प्यांमध्ये अनुक्रमे 29 जानेवारी व 5 फेब्रुवारी या दिवशी रविवारची सुटी असल्याने उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून वरील दोन्ही दिवशी सकाळी अकरा ते दुपारी तीन या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात यावेत, असे आदेश आज राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

महाराष्ट्र

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे यंदा राज्यात...

01.36 PM

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून...

10.48 AM

मुंबई : देश बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती, देशाला...

08.30 AM