राष्ट्रवादी भवनची वीज व पाणी तोडले 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई - मुंबईत राष्ट्रवादीचे एकमेव सुसज्ज व प्रशस्त असे पक्षाचे मुख्यालय असलेले राष्ट्रवादी भवन आता पाडण्यात येणार असून, मुंबई मेट्रोच्या कामात हे कार्यालय नामशेष होणार आहे. मेट्रोच्या कामात सरकारला सहकार्य करण्याचा करार केल्यानंतरही मेट्रो प्रशासनाच्या सूचनेवरून महापालिकेने या कार्यालयाचे वीज व पाणी जोडणी तोडली आहे. त्यामुळे, अचानक राष्ट्रवादीच्या कार्यालयातले पक्षाचे कामकाज ठप्प झाले असून तातडीने पक्षकार्यालयाचे स्थलांतर करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. 

राष्ट्रवादी सोबत कॉंग्रेसचे गांधी भवन व शिवसेनेचे शिवालय ही पक्षकार्यालये देखील विस्थापित होणार आहेत. मात्र, कॉंग्रेसला दादरचे टिळक भवन तर शिवसेनेला शिवसेना भवन ही कार्यालये आहेत. मात्र, राष्ट्रवादीला मुंबईत एकही हक्‍काचे कार्यालय नाही. त्यामुळे सर्वाधिक अडचण राष्ट्रवादीची झाली आहे. राज्य सरकारने या सर्व पक्षांना विविध ठिकाणी तात्पुरती कार्यालये उपलब्ध करून दिली आहेत. राष्ट्रवादीला बॅलार्ड पियरमध्ये ठाकरसी इमारतीत कार्यालय मिळाले आहे. मात्र, करारानुसार या नवीन कार्यालयाचे काम करून द्यायला हवे ते केले नसल्याने राष्ट्रवादीने ताबा सोडलेला नव्हता. त्यामुळे शनिवारी या कार्यालयाची वीज व पाणी तोडली आहे. आता, पक्षाचे कार्यालय तातडीने नवीन प्रस्तावित जागेत हलवणे किंवा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयाच्या समोरील बंगल्यातून कामकाज सुरू ठेवणे हाच पर्याय राष्ट्रवादीसमोर शिल्लक आहे.