Fact Check: एकनाथ शिंदे यांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

एकनाथ शिंदे हे मद्यपान करून झुलत आहेत अशा कॅप्शनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत तब्बल ४० आमदार घेऊन पक्षाशी बंड पुकारला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय बंड म्हणून शिंदेच्या राजकीय बंडाकडे बघितलं जातंय. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर टिकेच्या झोडी सुरू झाल्या आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ते 'पिऊन टाईट' आहेत असं नेटकऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सुरत विमानतळावरील आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी रात्री आमदार सुरतला पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजकीय नाट्य पहायला मिळालं होतं. त्यानंतर २१ जूनला रात्री हे सर्व आमदार सुरतवरून गुवाहटीला पोहोचत असताना सुरतच्या विमानतळावर ट्रॅव्हल्सने पोहोचले होते. त्यावेळी साधारण रात्रीचे एक ते दीड वाजले होते त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये शिंदे आपल्याला झुलताना दिसत आहेत.

पण व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सुरत विमानतळावरील असून त्यांनी याचवेळी माध्यमाला आपला प्रतिक्रिया दिलेली आहे. हा व्हिडिओ मध्यरात्रीचा असून त्यांच्या डोळ्यावरील झोप आपल्याला दिसत आहे. पण सुरत वरून गुवाहटीला जात असताना विमानतळावर ते माध्यमाला बोलले आहेत त्यावेळी ते मद्यपान करून बोलत असलेले दिसत नाहीत. त्यामुळे त्यांनी मद्यपान केले असल्याचा दावा करण्याला वाव राहत नाही. दोन्ही व्हिडिओ आपल्यासमोर आहेत. खालील व्हिडिओ पूर्ण पाहा यामध्ये आपल्याला एकनाथ शिंदे माध्यमांना बोलताना दिसत आहेत त्यामध्ये त्यांनी मद्यपान केलं आहे असं दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com