फडणवीस सरकार करणार 50 सामाजिक सेवा करार 

The Fadnavis government will make up about 50 social services contracts
The Fadnavis government will make up about 50 social services contracts

मुंबई : निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी उरला असताना, देवेंद्र फडणवीस सरकारने नागरिकांना सामाजिक सेवा देण्यासाठी पुन्हा स्वयंसेवी क्षेत्राची कास धरली आहे. दहा हजार गावांच्या परिवर्तनाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आता वैद्यकीय सेवांसह ग्राहकहितापर्यंतच्या विविध प्रकल्पांसंबंधीचे तब्बल 50 करार 28 जूनला करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रांतील स्वयंसेवी संस्थांशी याबाबत करार केले जाणार आहेत. अशा प्रकारचे करार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल. 

गाव परिवर्तनाच्या करारावेळी उद्योगपती रतन टाटा, संगीता जिंदल, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह पोपटराव पवारांपर्यंत अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यात कॉर्पोरेट, स्वयंसेवी क्षेत्राचे नवे पर्व निर्माण व्हावे, यासाठी विविध विभागांशी संबंधित कायद्यात नागरिकस्नेही बदल केले जाणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वात यासंबंधी तयारी सुरू आहे. सामाजिक क्षेत्रातले हे सरकारचे मोठे कॅम्पेन असेल. 

सरकारच्या प्रयत्नांना नवीन जोड देण्यासाठी सीएसआर कायदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कॉर्पोरेटच्या साह्याने राज्यात नागरिकस्नेही वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कैदी व्यवस्थापन ते वैद्यकीय आणि नागरी सुविधांपर्यंत अनेक उपक्रम राबविले जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com