डीपीसाठी शेतकऱ्याचे टॉवरवर चढून आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

सोलापूर - नदीला पाणी असूनही वीज वितरण कंपनीने डीपी बसवण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त झालेल्या शिरापूर येथील अनिल पाटील या शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील बिनतारी टॉवरवर चढून "शोले स्टाईल' आंदोलन सोमवारी सुरू केले. पोलिस आणि कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवले. 

मोहोळ तालुक्‍यातील शिरापूर येथील शेतकरी अनिल पाटील यांच्या शेतातील डीपी जळाल्याने त्यांना पिकाला पाणी देता येत नाही. यासंबंधी विनंतीअर्ज करूनही वीज वितरण कंपनीने पाटील यांच्या शेतात डीपी बसविला नाही. त्यामुळे पाटील यांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि कार्यालयाच्या आवारातील टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. तेथील पोलिस आणि कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांची पाटील यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवले.