बुलढाण्यात मतदान केंद्रावर दोन गटात जोरदार राडा; 4 जण गंभीर

Jalamb Gram Panchayat
Jalamb Gram Panchayatesakal
Summary

बुलडाणा जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीसाठी मतदान सुरू झालेय.

बुलढाणा : राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी (Nagar Panchayat Election) मतदान होत आहे. दरम्यान, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या (Jalamb Gram Panchayat) पोटनिवडणुकीसाठी (Election Updates) आज मतदान सुरुय. याचवेळी केंद्रावर जलंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून यात चार जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. या जखमींवर शेगाव (Shegoan) येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यात आज जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Election) 39, तर पंचायत समितीच्या (Panchayat Committee) 79 निर्वाचक गणांसाठी मतदान होत आहे. एकूण, 7 लाख 68 हजार 866 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1322 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. शिवाय, आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठीही (Nagar Panchayat Election) मतदान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Political Reservation) ही निवडणूक पार पडत आहे.

Jalamb Gram Panchayat
KMC Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या TMC ची जोरदार मुसंडी

जलंब येथे आज सकाळपासून ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) एका जागेसाठी मतदान सुरू झाले. सकाळीच दोन गटात सुरुवातीला बाचाबाची झाली आणि नंतर अचानक एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. सध्या गावात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीसाठी मतदान सुरू झालेय. मोताळा व संग्रामपूर या दोन नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या चारही पक्षाची सरळ लढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com