सनातनवरील बंदीबाबत 7 मार्चला अंतिम सुनावणी
मुंबई - सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर 7 मार्चला अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. राज्य व केंद्र सरकारने बंदी घालण्याच्या मुद्द्यावर स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी, असेही खंडपीठाने सांगितले. पनवेल व ठाण्यात झालेल्या बॉंब स्फोटामध्ये सनातनचा संबंध होता, त्यामुळे संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकादाराने केली आहे. मात्र बंदी घालण्याइतपत ठोस पुरावे नसल्याचा दावा केंद्र सरकारने यापूर्वी केला आहे. न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने याचिकेवर पुढील सुनावणी 7 मार्चला निश्चित केली आहे.