मी "फिट ऍण्ड फाइन' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कर्करोग झाला असल्याचे संदेश निराधार असल्याचे अमित आणि त्यांच्या मातुःश्री शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. मी "फिट ऍण्ड फाइन' असल्याचे अमित यांनी स्पष्ट केले आहे. 

मला कर्करोग असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत, पण तसे काहीही नाही. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर सक्रिय आहे. मी काही काळ आजारी होतो, हे खरे आहे; पण मला गंभीर आजाराने ग्रासल्याच्या बातम्या निराधार आहेत, असेही त्यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे. मी सध्या प्रचारात सक्रिय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शर्मिला ठाकरे यांनीही या संदेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा अफवा पसरविणाऱ्यांना काय मिळते, असा संतप्त सवाल त्यांनी केला. अमित यांना कर्करोग झाल्याचा संदेश व्हॉट्‌सऍपवर नुकताच व्हायरल झाला होता. राज ठाकरे यांनी प्रचाराला उशिरा सुरवात केल्यामुळेही लोकांमध्ये चर्चा सुरू होती. 

Web Title: fit and fine - amit thackeray