राज्यात चार ठिकाणी लवकरच नद्यांतून वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरणाने देशभरात 106 जलमार्ग प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. यात महाराष्ट्र आणि गोव्यातील 20 राष्ट्रीय जलमार्गांचा समावेश आहे. त्यापैकी चार नद्यांतून वाहतूक सुरू करण्यासाठी जलमार्ग विकास प्रकल्प व्यवस्थापक कक्षाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यात अंबा, दाभोळ खाडी ते वशिष्ठी, रेवदंडा खाडी ते कुंडलिका आणि सावित्री बाणकोट खाडी या चार प्रकल्पांचा समावेश आहे.

रस्ते वाहतुकीसह जलमार्गांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या योजनेसाठी देशातील 106 राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्याची योजना केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आखली आहे. त्यानुसार जलमार्ग प्राधिकरणाने नद्यांतून वाहतूक करण्यासाठी चाचपणी केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील आठ प्रकल्पांचे काम सुरू होईल. यात गोव्यातील मांडवी नदीचा समावेश असून, तिथे जेटी बांधण्यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येतील, असे जलमार्ग विकास प्रकल्पाचे उपाध्यक्ष प्रवीण पांडे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील चार नद्यांतील वाहतुकीविषयीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहे. त्यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येतील, असेही पांडे म्हणाले. राज्यातील जलवाहतूक विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळासोबत लवकरच करार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.