"राज्यात लवकरच मोफत रक्त चाचण्या' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - आरोग्यावर होणारा खर्च शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी निगडित आहे. याचा विचार करून राज्यात मोफत रक्त चाचण्यांची सुविधा देण्यात येणार आहे. डिजिटल लॉकरच्या मदतीने हे अहवाल सर्वत्र दिले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. हे सर्व रिपोर्ट डिजिटली देण्यात येणार आहेत. "एचएलएल' कंपनीच्या मदतीने राज्यभरात ही सेवा सुरू करण्यात येईल. मे अखेरपर्यंत राज्यभरात ही सुविधा सुरू होईल. याचा फायदा सहा कोटी बाह्यरुग्ण आणि आठ लाख बाळंतिणींना होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.