फळपीक विमा योजनेचा हप्ता वेळेत भरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये संत्रा, मोसंबी, पेरू, डाळिंब आणि चिकू या फळपिकांसाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. पाऊस, गारपिटीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा या योजनेचा उद्देश असून, शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता वेळेत भरावा, असे आवाहन कृषी आयुक्‍तालयाच्या फलोत्पादन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे - राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये संत्रा, मोसंबी, पेरू, डाळिंब आणि चिकू या फळपिकांसाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. पाऊस, गारपिटीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा या योजनेचा उद्देश असून, शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता वेळेत भरावा, असे आवाहन कृषी आयुक्‍तालयाच्या फलोत्पादन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्या महसूल मंडळात फळपिकांचे क्षेत्र 20 हेक्‍टर किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा महसूल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येते. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्‍तीची असून, बिगर कर्जदारांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांकरिता विमा हप्ता संरक्षित रकमेच्या पाच टक्‍के इतका निर्धारित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनीच्या नजीकच्या शाखेत किंवा ऑनलाइन विमा हप्ता भरता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क - मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

फळपीक विमा संरक्षित रक्‍कम शेतकऱ्यांनी भरावयाची रक्‍कम
डाळिंब एक लाख 21 हजार सहा हजार 50
संत्रा 77 हजार तीन हजार 850
मोसंबी 77 हजार तीन हजार 850
पेरू 55 हजार दोन हजार 750
चिकू 55 हजार दोन हजार 750

(आकडे रुपयांत)
विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख :

मोसंबी, संत्रा, पेरू - 14 जून
चिकू - 30 जून
डाळिंब - 14 जुलै

विमा कंपनी आणि कार्यक्षेत्र
1. टाटा एआयजी इन्श्‍यूरन्स कंपनी, ओरियन, कोरेगाव पार्क रस्ता, पुणे
टोल फ्री क्रमांक - 18002093536
कार्यक्षेत्र - पुणे, अकोला, सातारा, जालना, सोलापूर, सांगली, बुलडाणा, बीड, पालघर, वर्धा, नागपूर.

2. इफको टोकियो जनरल इन्श्‍यूरन्स कंपनी, गुरगाव, हरियाणा
दूरध्वनी क्रमांक - 020- 41080200
कार्यक्षेत्र - ठाणे, नांदेड, लातूर, नाशिक

3. द न्यू इंडिया एश्‍योरन्स कंपनी, फोर्ट, मुंबई
टोल फ्री क्रमांक - 18002091415
कार्यक्षेत्र - हिंगोली, जळगाव, वाशिम, यवतमाळ, अमरावती

4. एसबीआय जनरल इन्श्‍यूरन्स कंपनी, सेव्हन लव्ह चौक, स्वारगेट, पुणे
टोल फ्री क्रमांक - 18001232310
कार्यक्षेत्र- धुळे, नगर, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद

Web Title: fruit crop insurance scheme Department of Horticulture