आवाज ढोल-ताशांचाच!

आवाज ढोल-ताशांचाच!

पुणे  - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा पथकांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या आदेशामुळे डीजेचा आवाज बंद झाल्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणामध्ये घट झाल्याचे दिसून आले. मात्र, न्यायालयाचा आदेशही पायदळी तुडविण्याचे दुर्दैवी प्रकार काही मंडळांनी केल्याचे दिसून आले.

मुंबई
बहुतांश मंडळांनी लाउडस्पीकरच्या भिंती लावल्या नाहीत
काही मंडळांनी अशा भिंती व डीजे लावून ध्वनिप्रदूषण केले
ढोल-ताशा पथकांमुळेही प्रचंड ध्वनिप्रदूषण
ध्वनिप्रदूषणासंदर्भात पोलिसांनी २०२ गुन्हे नोंदविले

नाशिक
दुपारी बाराला मुख्य मिरवणुकीला सुरवात अन्‌ रात्री बाराला वाद्ये पोलिसांनी केली बंद
डॉल्बी-डीजेवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना प्राधान्य
भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांचा मुलगा नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या मंडळातर्फे डीजेचा दणदणाट
तपोवनात मिरवणुकीवेळी मद्यपी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर
नगरमध्ये वेळेत आणि शांततेत गणरायाला निरोप 
डीजेला परवानगी नाकारल्याने आठ मंडळे मिरवणुकीतून बाहेर 
कोपरगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना मारहाण

हिंगोली
हिंगोलीत डीजेचा कुठेही वापर नाही
रात्री साडेदहा वाजेपर्यंत विसर्जन

परभणी
जिल्हाभरात शांततेत मिरवणुका, कुठलीही अप्रिय घटना नाही

कोल्हापूर 
एकूण ३६५ मंडळांकडून ‘श्रीं’चे विसर्जन 
किरकोळ वादावादी, पोलिसांच्या लाठीमारात ५ जखमी 
मिरवणुकीत ध्वनियंत्रणेचा आवाज कमी, ढोल-ताशांचाच आवाज 
इचलकरंजीत २२ तास सुरू होती मिरवणूक 

सोलापूर 
एकाही मंडळाने वापराला नाही डीजे, पारंपरिक वाद्यांवर भर 
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साधला गणेशभक्तांशी संवाद

सातारा
गणेश विसर्जन शांततेत
खासदार उदयनराजे भोसले मिरवणुकीत सहभागी झाले नाहीत.

जळगाव
जळगावात युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
गिरीश महाजनांनी धरला ठेका
‘सकाळ- यिन’ सदस्यांच्या निर्माल्य संकलनास प्रतिसाद

विदर्भ
यवतमाळ - विसर्जनादरम्यान होणाऱ्या गर्दीवर वॉच ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर
वर्धा - हौदात सोमवारपर्यंत ३२०० मूर्तीचे विसर्जन करण्यात आले
चंद्रपूर : दोनशे गणेश मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग. रात्री उशिरापर्यंत विसर्जन
गडचिरोली - परवानगी न घेतलेल्या सहा डीजेचालकांवर पोलिसांनी कारवाई करून साहित्य जप्त केले. दोन ठिकाणी फटाक्‍यांमुळे एक दुकान जळून खाक झाले; तर दोन नागरिक जखमी झाले 
भंडारा : जिल्ह्यात रविवारी १२६ सार्वजनिक मंडळे व २०९ एक गाव एक गणपतींचे विसर्जन केले
गोंदिया - रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत २१३ सार्वजनिक गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

मोदकोत्सवानिमित्त हिंगोलीत यात्रा!
हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या मोदकोत्सवासाठी रविवारी राज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले. लाखो भाविकांच्या हजेरीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी मंदिरातर्फे मोदकोत्सवाचे आयोजन केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com