गिरीश महाजन यांचे सुरेश जैनांशी "गुफ्तगू'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

जळगाव - घरकुल गैरव्यवहारप्रकरणी अटकेतून नुकतेच जामिनावर सुटलेले शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन यांची राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली. महाजन यांनी बंद खोलीत सव्वा तास जैन यांच्याशी चर्चा केली. भाजपचे नेते एकनाथ खडसे व जैन यांचे वाद पाहता महाजन यांच्या चर्चेत अनेक गुपित दडल्याचे सांगितले जात आहे. 

सुरेश जैन यांची भेट घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची त्यांच्या निवासस्थानी गर्दी आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दुपारी चार वाजता त्यांची भेट घेतली. गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्यानंतर ते बाहेर आले; परंतु महाजन व जैन दोघांनीच बंद खोलीत सव्वा तास चर्चा केली. याबाबत महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, सुरेश जैन तब्बल साडेचार वर्षे कारागृहात होते. खूप मोठा काळ त्यांनी कारागृहात काढला, तब्बल दीड वर्षापासून आपली व त्यांची भेट नव्हती. ते सुटल्यानंतर आज त्यांना आपण सदिच्छा भेट घेण्यास आलो.
 
पक्षात नाराजी नाही
जैन यांची भेट घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या एका गटात नाराजी होईल काय? या विषयाला उत्तर देताना ते म्हणाले, राजकारणात पक्ष वेगळा असला तरी कुणीही कुणाची भेट घेऊ शकतो. तसेच जैन यांना राजकारणात तब्बल चाळीस वर्षे झालेली आहेत. त्यांचा राजकारणातील अनुभव आहे, तसेच ते जेष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची आपण वैयक्तिक सदिच्छा भेट घेतली, त्यामुळे भाजपमध्ये कोणाच्या नाराजीचा प्रश्‍नच नाही.

Web Title: Girish Mahajan S Jainism "guphtagu '