विद्यार्थ्यांना 11 वाजताच प्रश्‍नपत्रिका द्या! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

मुंबई  - बारावीच्या चार विषयांच्या प्रश्‍नपत्रिका व्हॉट्‌सऍपवर फुटल्याने बोर्डाची नाचक्की झाली. पुन्हा असे प्रकार होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना 11 वाजताच प्रश्‍नपत्रिका द्यावी, अशी सूचना मुंबई मुख्याध्यापक संघटनेने बोर्डाला केली आहे. 

विद्यार्थ्यांना अकरा वाजता प्रश्‍नपत्रिका द्यावी. त्यानंतरची दहा मिनिटे प्रश्‍नपत्रिका वाचायला द्यावीत आणि लिहिण्यासाठीही दहा मिनिटे जास्त द्यावीत, असेही मुख्याध्यापक संघटनेने म्हटले आहे. मुंबई विभागीय बोर्डाची दोन स्वतंत्र कार्यालये सुरू करावीत, त्यामुळे ताण कमी होईल, असेही संघटनेने सुचवले आहे. 

बारावीच्या मराठी, एसपी, गणित आणि बुक कीपिंग या विषयांच्या प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पेपर पडण्यापूर्वीच व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झाल्या. त्यामुळे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यास सुरवात केली. बुक कीपिंगची प्रश्‍नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर परीक्षा केंद्रात उशिरा आलेल्या तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरावर बंदी आहे; परंतु तेथे इंटरनेटवरही बंदी घालावी, अशी सूचना बोर्डाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी केली.