पवारांनी सरकार पाडून दाखवावेच  - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सांगली - शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाडण्याचा एकदा प्रयत्न करावाच, मग कळेल कोण कुठे आहे आणि सरकार कसे स्थिर राहते, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे लगावला. 

सांगली - शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाडण्याचा एकदा प्रयत्न करावाच, मग कळेल कोण कुठे आहे आणि सरकार कसे स्थिर राहते, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे लगावला. 

शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठिंबा देणार नाही, अशी गुगली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाकली होती. यास प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, ""भाजप-शिवसेनेची युती मोडणार नाही.'' भाजप-शिवसेनेतील वादावर बोलताना पाटील म्हणाले, की एकमेकांवर जी टीकाटिप्पणी सुरू आहे, हे काही बरोबर नाही. काही तात्त्विक वाद जरूर आहेत; मात्र सरकार पाडण्यापर्यंत उद्धवजी छोट्या मनाचे नाहीत. त्यासाठी आमची बोलणी सुरू आहेत. लवकरच वाद मिटेल. जर सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्यास विविध पक्षांतील भाजपप्रेमींना एकत्रित घेऊन सरकार सक्षमपणे स्थिर होईल. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या वादाबाबत बोलताना पाटील म्हणाले, ""भाजपचे नेते फूस लावताहेत, असा केला जाणारा आरोप पूर्णतः चुकीचा आहे. दोघा नेत्यांत फूट पडू नये यासाठी आम्ही वारंवार सदाभाऊंशी बोलतो. कारण दोघे मिळून राहिले, तरच शेतकरी संघटनेची ताकद दिसेल.''

Web Title: The government let down - chandrakant patil