शासनाकडून विक्रमी तूर खरेदी - देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई - तूर खरेदीसाठी "नाफेड'तर्फे केंद्र सुरू करण्यात आल्याने यंदा विक्रमी तूर खरेदी झाली असून, गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक; म्हणजे 34 लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे. शासनाने पाच हजार 50 रुपये हमी भाव देऊन आतापर्यंत 34 लाख क्विंटल अशी सर्वाधिक तूर खरेदी केली आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू राहावीत, यासाठी केंद्राला विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

केंद्राने तूर खरेदीचा 90 दिवसांचा कालावधी दिला होता. तो 15 मार्चपर्यंत होता. त्यानंतर राज्य शासनाने केंद्रास विनंती करून एक महिना मुदतवाढ घेतली होती. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी 15 एप्रिलनंतर ही तूर खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यासाठी केंद्राला विनंती करण्यात आली आहे. तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी आणली होती. मात्र खरेदी केंद्रावर बारदानांचा तुटवडा जाणवल्याने शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. 2012-13 मध्ये तुरीला तीन हजार 850 रुपये हमी भाव देण्यात आला होता. त्या वेळी एक लाख क्विटंलपेक्षा कमी तूर खरेदी झाली होती. 2013-14 मध्ये हमी भाव तीन हजार 400 रुपये देण्यात आला होता आणि दोन लाख 75 हजार क्विंटल खरेदी झाली होती. 

दरम्यानच्या काळात शासनाने तूरडाळीच्या घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठीच्या साठवणूक मर्यादेत तीन पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वी तूर खरेदी केंद्रांची मर्यादा 50 किलोमीटर अंतराची होती ती आता वाढवून 120 किलोमीटरपर्यंत करण्यात आली आहे.

Web Title: Government purchases record tur

टॅग्स