मुले मातृभाषेपासून दुरावत आहेत : राज्यपाल सी. विद्यासागर राव 

मुले मातृभाषेपासून दुरावत आहेत : राज्यपाल सी. विद्यासागर राव 

मंबुई : इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुले हळूहळू मातृभाषेपासून दुरावत चालली आहेत. बालसाहित्य अधिकांश इंग्रजी भाषेतून निर्माण होत आहे. पुढील काही वर्षानंतर मुलांना मातृभाषेतून लिहिता-वाचता येऊ शकेल की नाही, अशी चिंताजनक परिस्थिती दिसत आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून भारतीय भाषांमधून अधिक बालसाहित्य निर्माण करावे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. 

उर्दू भाषेतून प्रकाशित होत असलेल्या "गुलबुटे' या लहान मुलांच्या मासिकाच्या पहिल्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. राव म्हणाले, ""चोवीस तास उपलब्ध असलेले लहान मुलांचे दूरचित्रवाणी चॅनेल्स, इंटरनेट आणि मोबाईल गेममुळे लहान मुले साहित्य, वाचनापासून दूर जात आहेत. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना चांगल्या साहित्याची गोडी लावण्यासाठी पालक व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.'' 

चांगले साहित्य नैतिक मूल्यांची वृद्धी करते. तसेच एकता आणि अखंडतेची भावना वाढविते. यासाठी चांगल्या साहित्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. शाळांनी आपली वाचनालये अशा पुस्तकांनी सुसज्ज करावीत. तसेच शिक्षकांनी डिजिटल माध्यमातून गोष्टी सांगून मुलांना साहित्याची गोडी लावावी, असे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com