एकहाती सत्तेसाठी पदवीधर निवडणूक महत्वाची - आदित्य ठाकरे

सुनील पाटकर
शनिवार, 9 जून 2018

आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्या दृष्टिने कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची आहे. राज्यात शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी व या निवडणूकीतही विजय मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज महाड येथे केले. 

महाड : आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्या दृष्टिने कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची आहे. राज्यात शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी व या निवडणूकीतही विजय मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज महाड येथे केले. 

कोकण पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारार्थ महाड येथील डॅा.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित केलेल्या मार्गदर्शन सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी केंद्रिय मंत्री अनंत गीते, खासदार अनिल देसाई, आमदार भरत गोगावले, .राहूल पाटिल आदी उपस्थित होते. मतदारांमध्ये पन्नास टक्के नोंदणी शिवसेनेच्या मतदारांची असल्याने शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. सिनेटच्या विजयानंतर केलेल्या कामांचा उहापोहही त्यांनी आपल्या भाषणात केला. 
उमेदवार संजय मोरे यांनी आपला परिचय करुन देत शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी केलेल्या कामांबाबत माहिती दिली व यामुळे आपला विजय सुकर असल्याचे सांगितले. 
यावेळी सभापती सिताराम कदम, नितिन पावले, बाळकृष्ण राउळ, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, सुर्यकांत कालगुडे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Graduate election for monopoly power is important - Aditya Thackeray